Ajit Pawar : 'मनसे'चा महायुतीला फायदाच होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुती मध्ये सहभागी होणार असेल तर आमची सर्वांची गोळाबेरीज होऊन चांगले परिणाम दिसून येतील.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

धायरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुती मध्ये सहभागी होणार असेल तर आमची सर्वांची गोळाबेरीज होऊन चांगले परिणाम दिसून येतील. एनडीए मध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे त्या संदर्भात 'मनसे'शी देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे त्याचा महायुतीला फायदाच होणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

बारामती लोकसभा समन्वय बैठक मुक्ताई गार्डन येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पुणे, शिरूर, बारामती लोकसभा क्लस्टरचे प्रमुख ना. चंद्रकांत पाटील व महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांच्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी व्यासपीठावर होते.

अजित पवार यांनी खडकवासल्यात घड्याळाला मतदान होत नाही असे नमूद करत घड्याळ चिन्हाविषयी चिंता व्यक्त करताना महायुतीच्या घटक पक्षांना त्यांनी सांगितले की घड्याळाला भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करत नाहीत. मात्र मतदारांना सांगा बारामती शिरुर मध्ये आपले चिन्ह घड्याळ आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'प्रत्येक बुथवर १००० ते १२०० मतदान असते. समजा ५० टक्के एकजण मतदान झाले आणि त्यापैकी ३७० मतदान झाले तर आपला उमेदवार विजयी होईल. त्यामुळे प्रत्येक बूथवर महायुतीसाठी मतदान होईल याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.'

आपल्या नावापुढे आईचे नाव लावण्याच्या  मोदींच्या निर्णयामुळे यामुळे मातृत्वाचा गौरव झाला आहे. त्यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

पार्थ पवारांचा गुप्त पद्धतीने प्रचार

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात दिसत नसल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर गमतीशीर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की पार्थ पवार गुप्त पद्धतीने प्रचार करत आहेत. प्रचार सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह वापरण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com