Mukesh Dalal : भाजपच्या परडीत पहिले ‘कमळ’ ; सुरतमध्ये मुकेशकुमार दलाल बिनविरोध विजयी

लोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष विजयाचे दावे करत असतानाच आज अचानक भाजपच्या झोळीत पहिल्या विजयाचे दान पडले.
Mukesh Dalal
Mukesh Dalalsakal

सुरत : लोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष विजयाचे दावे करत असतानाच आज अचानक भाजपच्या झोळीत पहिल्या विजयाचे दान पडले. काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरलेल्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप वगळता उर्वरित आठ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेशकुमार दलाल यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध विजयी घोषित केले.

त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गुजरातमधील २६ जागांसाठी सात मे रोजी मतदान होत आहे. सुरत मतदारसंघात भाजपकडून मुकेशकुमार दलाल, काँग्रेसतर्फे निलेश कुंभानी यांनी अर्ज भरले होते. याशिवाय चार अपक्षांसह १० उमेदवार रिंगणात होते. कुंभानी यांच्या नावाचा प्रस्ताव देणाऱ्यांच्या सह्यांमध्ये घोळ झाल्याने रविवारीच त्यांचा अर्ज बाद झाला होता.

हुकुमशहाचा खरा चेहरा (असली सुरत) समोर आला आहे. आपला नेता निवडण्याचा जनतेचा हक्क हिरावून घेणे, हे राज्यघटना नष्ट करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ही निवडणूक राज्यघटना आणि देश वाचविण्यासाठी आहे.

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

सुरतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले कमलपुष्प अर्पण केले आहे.

- सी. आर. पाटील,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com