PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

''चार टप्प्यातल्या निवडणुका झाल्या आहेत. चारही टप्प्यांमध्ये विरोधक संपले आहेत. त्यामुळे देशातील जनतेचा कौल लक्षात आलेला असून एनडीए पुन्हा एकदा चारशेपेक्षा जास्त जागांवर निवडून येणार आहे. भाजप आपले सगळे जुने रेकॉर्ड मोडणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.''
PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

Mumbai Loksabha election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमध्ये सभा घेतल्यानंतर मुंबईमध्ये रोड शो केला. या रोड शोला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी मोठी गर्दी केली होती. मोदींची एक छबी टिपण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती.

रोड शोदरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हिंदी टीव्ही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशामध्ये एनडीए आपले जुने रेकॉर्ड मोडणार असल्याचं सांगून चारशेपेक्षा जास्त जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

मोदी म्हणाले की, चार टप्प्यातल्या निवडणुका झाल्या आहेत. चारही टप्प्यांमध्ये विरोधक संपले आहेत. त्यामुळे देशातील जनतेचा कौल लक्षात आलेला असून एनडीए पुन्हा एकदा चारशेपेक्षा जास्त जागांवर निवडून येणार आहे. भाजप आपले सगळे जुने रेकॉर्ड मोडणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...
IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

पंतप्रधान पुढे बोलले की, विरोधक म्हणतात तसा ओव्हर कॉन्फिडन्स आमच्यात नाहीत. मी जनतेच्या विश्वासाला ओळखतो.. त्यावरुन यावेळी भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचं दिसून येत आहे. खरी शिवसेना, एनसीपी दोन्ही भाजपसोबत आहेत. नकली पक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे आहेत.

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...
Pune News : धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

विरोधक मोदींवर शहेंशाह म्हणून टीका करतात. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, मला शहेंशाह म्हणतात, खरं बोलतात. मी इतकं सहन केलंय इतके आरोप, इतक्या शिव्या सहन केल्यात की मी शहेंशाहच आहे. आमचा मंत्र आहे, सबका साथ, सबका विकास.. सबका विश्वास. त्यांनी देशाला धर्माच्या आधारावर देशाला विभागून टाकलं आहे, त्यामुळे देशातील लोक त्यांचं राजकारण संपवणार आहेत.. असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com