Sharad Pawar : नरेंद्र मोदी फक्त त्यांच्या पक्षापुरते बोलतात; शरद पवार यांची टीका

Sharad Pawar : रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवार जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी भूमिका मांडली.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal

जळगाव : एकनाथ खडसे ज्येष्ठ व प्रभावी नेते आहेत. मात्र, त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी, समस्या असतील.. त्यामुळे त्यांनी आमचा पक्ष सोडून भाजपत जाण्याचा निर्णय घेतला असण्याची दाट शक्यता आहे, याचा पुनरुच्चार करत शरद पवारांनी त्यांची पाठराखण केली. खडसेंच्या राजीनाम्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, जयंत पाटलांकडे त्यासंबंधी माहिती असू शकते, असेही पवार म्हणाले.

रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारार्थ ते जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी भूमिका मांडली. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, सुरवातीपासून हा जिल्हा काँग्रेस विचारांना मानणारा आहे. मध्यंतरीच्या काळात हे चित्र बदलले असेल. परंतु, तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा तीनही पक्षांचे कार्यकर्ते सध्या जिल्ह्यात खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे या वेळी निकाल वेगळे असतील, असे पवार म्हणाले.

भाजप उमेदवार पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, या गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार घेताना या मतदारसंघात १८ लाख मतदार आहेत. त्यामुळे महाजनांनी त्यांचे मताधिक्य कमी सांगितले, उलट त्यांचे उमेदवार १८ लाखांच्या फरकाने निवडून येतील, अशी उपरोधिक टीका पवारांनी केली. संतोष चौधरींचे भाषण तुम्ही ऐकले, त्यात कुठेही नाराजी दिसली का? असा प्रतिप्रश्‍न करत पवारांनी चौधरींच्या बंडाच्या विषयास पूर्णविराम दिला. या वेळी त्यांच्यासमवेत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे उपस्थित होत्या.

Sharad Pawar
Mumbai BJP Office Fire: मुंबईतील भाजप कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मोदींचे भाषण पक्षापुरते मर्यादित-

सभेच्या भाषणात मोदींवर टीका करण्यासंबंधी पवारांना विचारले असता, ते म्हणाले, आपण अनेक वर्षांपासून निवडणुका पाहत आलो आहोत. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान प्रचाराला आले की, देशाविषयी, देशाच्या विकासासंबंधी बोलायचे. नरेंद्र मोदी त्यास अपवाद आहेत. मोदी फक्त त्यांच्या पक्षापुरते बोलत असतात. त्यात कुठेही देशाच्या विकासाचे, देशहिताचे विषय नसतात. पंतप्रधान म्हणून भाषण अपेक्षित असताना त्यांचे भाषण एखाद्या पक्षाच्या नेत्यासारखे मर्यादित असते, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar
Akola News : समाज, देश एकसंघ राहण्यासाठी संविधानाचे उद्दिष्ट महत्वाचे ; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com