Omar Abdullah : बहिष्काराची परंपरा सोडून द्या ; अब्दुल्ला

आगामी लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे. तसेच आपला आवाज दिल्लीत पोहोचण्यासाठी बहिष्काराची परंपरा सोडून देण्याचे आवाहन नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला गुरुवारी केले.
Omar Abdullah
Omar Abdullahsakal

श्रीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे. तसेच आपला आवाज दिल्लीत पोहोचण्यासाठी बहिष्काराची परंपरा सोडून देण्याचे आवाहन नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला गुरुवारी केले.

चनपोरा मतदारसंघातील सनतनगर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अब्दुल्ला म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या कारणांमुळे श्रीनगरमधील मोठा वर्ग मतदानापासून दूर राहत असे. पण आता बहिष्काराची कोणतेही चर्चा नाही व मानेवर बंदूक नाही. त्यामुळे धाक नसल्याने मतदान करायला हवे.

Omar Abdullah
Union Ministers : खासदारकी संपूनही मंत्रिपद कायम ; केंद्रातील सात मंत्र्यांना पूर्वीच्या कायदेशीर अभिप्रायाचा आधार

‘‘काश्मीरमधून ३७० वे कलम हटविण्याचा निर्णय ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला. याबद्दलची भूमिका दिल्ली आणि जगापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत आहे. तुम्ही या निर्णयावर खूष असाल तर भाजप आणि त्यांच्या स्थानिक घटकांना मतदान करण्यापासून अडवीत नाही. जर तुम्ही खूष नसाल तर तुम्हाला मोठ्या संख्येने बाहेर पडावे लागेल आणि ‘एनसी’ला मत द्यावे लागेल,’’ असेही अब्दुल्ला म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com