Gondia Cash Seized: गोंदियात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! 2 कोटींची कॅश अन्...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणुका पार पडणार आहेत.
Gondia Cash Seized
Gondia Cash Seized

गोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणुका पार पडणार आहेत. याचा प्रचार जोरदार सुरु असतानाच सुमारे २ कोटी रुपयांची रोख रक्कम निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. (Election Commission surveillance team seized cash worth Rs 1.76 crore in Goregaon Gondia)

एएनआयच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं गोंदियातील गोरेगाव इथं छापेमारी केली. यामध्ये १.७६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गोंदियाच्या जिल्हा माहिती कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Gondia Cash Seized
Amravati Lok Sabha 2024: लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच; भाजपने उमेदवारी दिल्या नवनीत राणा काय म्हणाल्या?

दरम्यान, भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडणार असून १९ एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे. आजच या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. (Marathi Tajya Batmya)

यानंतर आता २० दिवस केवळ प्रचार करता येणार आहे. त्यानंतर एक दिवस प्रचार थांबेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर याचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com