NCP Declaration : सन्माननिधीत आणि पीकविम्याच्या व्याप्तीत वाढ करू ; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनाम्यात आश्‍वासन

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न दिले जावे, या मागणीसह शेतकरी सन्माननिधीत भरीव वाढ, जातीनिहाय जनगणना, अपारंपरिक वीजनिर्मितीला चालना अशी आश्‍वासने देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.
NCP Declaration
NCP Declarationsakal

मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न दिले जावे, या मागणीसह शेतकरी सन्माननिधीत भरीव वाढ, जातीनिहाय जनगणना, अपारंपरिक वीजनिर्मितीला चालना अशी आश्‍वासने देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही महायुतीसोबत असलो तरी आमची विचारधारा सोडलेली नाही, असेही या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पक्षाच्या भूमिकेला आणि विचारांना सुसंगत असलेले मुद्दे आणि मागण्या यामध्ये मांडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. महायुतीसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे अजित पवार यांनी यावेळी समर्थन केले.

राजकीय भूमिका, राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, फारुख अब्दुल्ला यांनीही त्या त्या वेळी वेगळी भूमिका घेतली होती, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. तसेच, महायुतीसोबत गेलो असलो तरी विचारधारा कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NCP Declaration
Loksabha election 2024 : प्रचाररथ भरकटला, सामान्यांचे प्रश्न गायब; पंतप्रधानांच्या टीकेवर विरोधी पक्ष संतापले

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ‘भारतरत्न’ दिले जावे, ही प्रमुख मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. जातीनिहाय जनगणना केली जाण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना एमएसपी मिळावी, अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पीकविम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना या मुद्द्यांचाही समावेश जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

मतदानाचा हक्क बजवावा

विदर्भात मतदान टक्केवारीने कमी झाले, याबाबत अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. तसेच, शेतकऱ्यांचे गारपिटीने नुकसान होत आहे. यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता न आणता संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com