Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; 21 राज्यातील सर्वाधिक जागांवर होणार मतदान

Loksabha Election 2024 Marathi News : लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
Loksabha election 2024
Loksabha election 2024Esakal

Lok Sabha Election 2024: लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे. (Nomination process for 1st phase of LS polls on April 19 begins in 102 seats across 21 states and UTs with issuance of notification)

Loksabha election 2024
Bacchu Kadu: बच्चू कडूंना मोठा दिलासा! हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द; कोर्टानं दिले 'हे' महत्वाचे निर्देश

पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. (Latest Marathi News)

Loksabha election 2024
Lok Sabha Election 2024: देशातील 543 जागांवर कधी होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर माहिती

या सर्व राज्यांमध्ये मिळून १०२ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Loksabha election 2024
World Happiness Report 2024: जगातील सर्वात आनंदी देशात भारताचा क्रमांक कितवा? आनंदी देश कसा ठरवला जातो?

पहिल्या टप्प्यासाठी आज २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी २८ मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com