MS Dhoni Video: तेच मैदान अन् तोच माही! धोनीने चौकार-षटकारांची बरसात करत 19 वर्षांपूर्वीच्या आठवणी केल्या ताज्या

IPL 2024, DC vs CSK: चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनीने विशाखापट्टणमला झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली.
MS Dhoni | Chennai Super Kings | IPL 2024
MS Dhoni | Chennai Super Kings | IPL 2024Sakal

MS Dhoni Batting: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 13वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. रविवारी (31 मार्च) विशाखापट्टणममधील मैदानात झालेल्या या सामन्यात दिल्लीने 20 धावांनी विजय मिळवला.

पण असे असले तरी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आक्रमक अंदाजातील फलंदाजी या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरली.

धोनी जवळपास तब्बल 300 दिवसांनंतर चाहत्यांना फलंदाजी करताना दिसला. त्याला चेन्नईने आयपीएलच्या 17व्या हंगामात खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यात फलंदाजी मिळाली नव्हती.

परंतु, दिल्लीविरुद्ध 192 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 120 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतर धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने फलंदाजीला आल्यापासूनच फटकेबाजी सुरू केली.

MS Dhoni | Chennai Super Kings | IPL 2024
Hardik Pandya IPL 2024 : वानखेडेवर चुकीला माफी नाही... हार्दिक पांड्याला एमसीएने देखील दिला धक्का

धोनीने या सामन्यात 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. तसेच जडेजाबरोबर 7 व्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांना चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. परंतु, धोनीला फटकेबाजी करताना पाहून मात्र मैदानातील प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

धोनीने 20 व्या षटकात तर दोन षटकार आणि दोन चौकार ठोकत 20 धावा वसूल केल्या. त्याने एन्रिच नॉर्कियाविरुद्ध या षटकात केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

जुन्या आठवणींना उजाळा

विशाखापट्टणममध्ये धोनीने फटकेबाजी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2005 मध्ये धोनीने पहिले आंतरराष्ट्रीय शतक पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणममध्येच ठोकले होते. त्यावेळी झालेल्या वनडेत त्याने 123 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत 148 धावा केल्या होत्या.

इतकेच नाही, तर 2016 सालच्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विशाखापट्टणममध्येच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळताना धोनीने 32 चेंडूत 64 धावांची खेळी केली होती. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले होते. त्या सामन्यात त्याने 20 व्या षटकात 23 धावा ठोकल्या होत्या आणि पुण्याला विजय मिळवून दिला होता.

MS Dhoni | Chennai Super Kings | IPL 2024
MS Dhoni DC vs CSK : धोनी टी 20 क्रिकेटच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच विकेटकिपर

चेन्नईचा पराभव

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 191 धावा केल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने 52 धावांची खेळी केली, तसेच कर्णधार ऋषभ पंतने 51 धावांची खेळी केली. त्याचबरोबर पृथ्वी शॉ याने 27 चेंडूत 43 धावांची खेळी केली. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर चेन्नईला 20 षटकात 6 बाद 171 धावा करता आल्या. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तसेच डॅरिल मिचेलने 26 चेंडूत 34 धावांची खेळी केली, तर रविंद्र जडेजाने 17 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com