Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

भाजप खरंच ४०० पार जाईल का? यावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Sharad Pawar NCP slam devendra fadnavis
Sharad Pawar NCP slam devendra fadnavis

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत महाराष्ट्रातील दोन मोठे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपल्यासोबत येण्याची थेट ऑफर दिली होती. मोदींच्या या भूमिकेमुळं राज्याच्या राजकारणात भलतीच चर्चा सुरु झाली होती.

पण आता मोदींच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (PM Modi has not made any offer to Sharad Pawar Uddhav Thackeray explanation by Devendra Fadnavis)

Sharad Pawar NCP slam devendra fadnavis
Lok Sabha Election 2024: जळगावमध्ये अपक्ष आमदाराचा स्वतः एकट्यानंचं प्रचार सुरु; व्हिडिओ व्हायरल

फडणवीस म्हणाले, "आजपर्यंत पवारसाहेबांचं जर एकूण राजकारण तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळं पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ ज्यांना इतिहास माहितीए त्यांना समजतो. तोच संदर्भ मोदींचा होता त्यांनी दिलेली कुठलीही ऑफर नव्हती"

Sharad Pawar NCP slam devendra fadnavis
Rain Update: राज्यभरात अवकाळीचं सावट! 15 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

दरम्यान, शरद पवारांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या खूपच जवळ येतील किंवा विलीन होतील, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोदींनी पवार-ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती.

Sharad Pawar NCP slam devendra fadnavis
Rain Update: राज्यभरात अवकाळीचं सावट! 15 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

चारशे पारची घोषणा अडचणीत?

भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता, पण आता तशी परिस्थिती दिसत नाही. या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, "तुमच्या मनात ही निवडणूक आमच्यासाठी कठीण दिसतेय तशी आमच्या मनात ती नाही. आम्ही जशी अपेक्षित केली होती तशीच ती आमच्यासाठी आहे. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. पण हे खरं आहे की पवार साहेब, उद्धव ठाकरे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तर ३५ जागा महाविकास आघाडीला मिळतील असं सांगितलं.

पण मी त्यांचे धन्यवाद मानतो की, त्यांनी किमान १५ जागातरी आमच्यासाठी सोडल्यात. हा जो काही नरेटिव्ह आहे तो सुपरफिशिअल आहे. तिन्ही पक्ष मिळून आमची निवडणूक व्यवस्थित चालू आहे, त्यामुळं अपेक्षित जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com