Prakash Ambedkar : काँग्रेस व वंचित विधानसभेत एकत्र शक्य

‘‘आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यामुळे नाराजी सोडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करा,’’ असे आवाहन ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal

मुंबई : ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यामुळे नाराजी सोडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करा,’’ असे आवाहन ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले.

विधानसभा निवडणुकीची आपण एकत्र तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला असल्याचे आंबेडकर यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल तसेच लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर भूमिका मांडली. तसेच सहा महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘वंचित’ येण्याची शक्यता वर्तवली. विधानसभेत काँग्रेसबरोबर एकत्र येणार असल्याने आता ‘वंचित’ला मते द्या, असे प्रचार आंबेडकर यांनी सुरु केला आहे.

Prakash Ambedkar
Loksabha Election 2024 : जाहीरनाम्यात कामगार हक्क दुर्लक्षित ; नाममात्र पक्ष वगळता ठोस भूमिका नाही

मुंबईत सर्व जागा लढणार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी ‘वंचित’ची बोलणी फिसकटल्याने त्यांचा आघाडीमध्ये समावेश झाला नाही. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा देत काँग्रेससोबत सौहार्द टिकवण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईत वंचित महाविकास आघाडीच्या विरोधात सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com