Pune Lok Sabha Election 2024: आबा बागूल यांचं बंड झालं थंड! पटोलेंशी चर्चेनंतर धंगेकरांचा करणार प्रचार

पुणे लोकसभेसाठी आबा बागुल हे इच्छुक होते पण काँग्रेसनं रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते नाराज झाले होते.
Ravindra Dhangekar_Aba Bagul
Ravindra Dhangekar_Aba Bagul

पुणे : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं बंड अखेर थंड झालं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी बागुल यांची इच्छा होती त्यामुळं रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ते नाराज झाले होते. यासाठी त्यांनी काँग्रेस भवनात उपोषणही केलं होतं. पण आता त्यांनी आपल्या भूमिकेवरुन युटर्न घेतला आहे. (Pune Lok Sabha Election 2024 Aba Bagul rebellion has cooled down will campaign for Ravindra Dhangekar)

Ravindra Dhangekar_Aba Bagul
Raj Thackeray: ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा! भेटीनंतर श्रीकांत शिंदेंनी सांगितली स्ट्रॅटेजी

आम्ही नाराजी नव्हती आम्ही काँग्रेसचेच आहेत, निष्ठावान आहोत. आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत आमचं म्हणणं मांडत होतो. आमचं म्हणणं ऐकून घ्या, आमच्यातही काहीतरी क्वालिटी आहे हेच आम्ही त्यांना सांगत होतो, असं आबा बागुल यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Ravindra Dhangekar_Aba Bagul
China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

आमच्यात नाराजी नाही - बागुल

नानांनी आमच्या मनातील शंकांचं निरसन केलं आहे. त्यामुळं आमच्यात काहीही नाराजी नाही. पर्वती मतदारसंघ आम्ही तीनवेळा आघाडीला सोडला आहे, पण तो आता आपल्याकडं घ्यावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं केली तर त्यांनी त्याला सांगितलं की शंभर टक्के आपण हा मतदारसंघ आपल्याकडं घेऊ. काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार आहोत. धंगेकर आमचे मित्र आहेत त्यामुळं आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत, अशा शब्दांत बागुल यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Ravindra Dhangekar_Aba Bagul
Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

धंगेकर हे आजच विजयी झालेत

नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावर बागूल म्हणाले की, "काही नाही आमची वैयक्तिक भेट होती. पुण्यात रविंद्र धंगेकर हे आजच विजयी झालेले आहेत, चांगल्या मतांनी ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com