Sangli Loksabha: सांगलीत मविआचा उमेदवार सेनेचा असणार की काँग्रेसचा? उद्या होणार फैसला

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी पत्रकार परिषदेतून मांडली भूमिका, संजय राऊतांवर व्यक्त केली नाराजी
Sangli_Chandrahar Patil Vishal Patil
Sangli_Chandrahar Patil Vishal Patil

मुंबई : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण काँग्रेसनं अद्यापही या जागेवरचा आपला दावा सोडलेला नाही. मविआतील या दोन्ही पक्षांकडून याबाबत आपापले दावे केले आहेत.

पण संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. तसेच उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून यामध्ये सांगलीतून मविआचा अधिकृत उमेदवार कोण असेल? याचा निर्णय घोषित होईल, असं त्यांनी सांगितलं. (Vishal Patil congress candidate of Sangli lok sabha constituency press conference)

Sangli_Chandrahar Patil Vishal Patil
Ambulance Scam : "अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यात 280 कोटींचा अ‍ॅडव्हान्स...."; रोहित पवारांनी पुन्हा टाकला बॉम्ब

पत्रकार परिषदेत बोलताना विशाल पाटील म्हणाले, काँग्रेसमध्ये सर्वांनी निर्णय घेतला होता की विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं आणि उमेदवारी पक्षाच्या बाजूनं घ्यायची. त्याची खात्री आम्ही कदम यांना दिली होती. सर्वांच्या मताचा विचार करुन माझ्या नावाचा निर्णय झाला. पण जागा वाटपाचा तिढा अनपेक्षितपणे निर्माण झाला आहे. तरी देखील यावरुन वाद घालण्यापेक्षा आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. (Marathi Tajya Batmya)

Sangli_Chandrahar Patil Vishal Patil
Manipur Lok Sabha Campaign: मणिपूरमध्ये प्रचारातही भीतीचं सावट कायम! सार्वजनिक सभा नाही, इन कॅमेरा बैठकांवर भर

पण गेल्या काही दिवसांपासून मीडियातून मोठी चर्चा सुरु झाली आहे. खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. पण विश्वजीत कदम यांच्यावर संशय निर्माण करुन बोलणं, त्यांच्याविरोधात बोलणं ये युती धर्माला शोभणार नाही. (Latest Marathi News)

कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याच्या वल्गना करणं हे अत्यंत चुकीचं आहे. एवढं त्यांनी मनाला का लावून घेतलं? सांगलीचा विषय बंद खोलीत व्हायला हवा होता तो बाहेर आला म्हणून विश्वजीत कदमांनी याला उत्तर दिलं. संजय राऊतांनी दोन-तीन दिवस इथं का वायाला घालवले? पण त्यांना अंदाज आला असेलच. त्यामुळं त्यांचं मनपरिवर्तन झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Sangli_Chandrahar Patil Vishal Patil
Congress Leaders: २०१४ च्या मोदी लाटेपासून १२ माजी मुख्यमंत्र्यांनी सोडला काँग्रेसचा हात, अशोक चव्हाणांसह 'या' नेत्यांचा समावेश

सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत, स्वार्थी आहेत. लोकांसाठी काम करण्यात किती कमी पडले आहेत. हे जनतेपुढं सांगण्याचा आम्ही यशस्वी ठरलो आहोत म्हणून भाजपचा पराभव इथं शंभर टक्के निश्चित आहे, हे आम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळं आघाडीत ऐवढं चांगलं रान काँग्रेसनं पेटवलं तर आपलं उमेदवार निवडून आणण्याची मागणी करु शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com