किस्से निवडणुकीचे ; आठवले जेव्हा जमिनीवर आले!

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या पंढरपूर मतदारसंघातून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी निवडणूक लढविली होती. आताच्या माढा मतदारसंघातील काही भाग व सोलापूर मतदारसंघातील काही भाग मिळून पंढरपूर मतदारसंघ बनला होता.
ramdas athawale
ramdas athawalesakal

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या पंढरपूर मतदारसंघातून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी निवडणूक लढविली होती. आताच्या माढा मतदारसंघातील काही भाग व सोलापूर मतदारसंघातील काही भाग मिळून पंढरपूर मतदारसंघ बनला होता. त्यावेळी त्यांचे चिन्ह हे खटारा (बैलगाडी) होते.

या मतदारसंघातील अगदी शेवटच्या गावातील सभेला पोचणे म्हणजे दिव्यच होते. शेवटच्या सभेला रात्री बराच उशीर झाला. उशीर झाल्याने मतदार घरी निघून गेले. मात्र, उशिराने का होईना उमेदवार आठवले आलेच. तोपर्यंत गावातील सभेचे नियोजनकर्तेही घरी गेले. ग्रामपंचायतीसमोरील काही कार्यकर्ते, श्रोते यांना एकत्र करत त्यांनी संबोधित करायचा सुरवात केली.

ramdas athawale
Loksabha Election 2024 : शक्‍तिप्रदर्शन ; विदर्भातून राणा, पाटील,आंबेडकरांनी भरला अर्ज,मराठवाड्यातून कदम, चिखलीकर मैदानात

हळूहळू गर्दी वाढायला लागली. एक उंच जागा पाहून आठवले त्यावर उभे राहत भाषण करत होते. इतक्यात नियाजनकर्ते आले. मात्र त्यांना कळेना की, आपला उमेदवार कुठे उभा राहून बोलत आहे. एक सुशिक्षित कार्यकर्ता पुढे आला. त्याने पाहिले तर जिथे भाषण सुरू होते. तो ध्वजस्तंभ उभारण्यासाठी बांधण्यात आलेला कठडा होता. ही बाब निदर्शनास आणून देताच ते ‘सॉरी’ म्हणत आठवलेंची स्वारी जमिनीवर आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com