Rashmi Barve
Rashmi Barveesakal

Rashmi Barve: रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा! जात पडताळणी समितीच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

नागपूर येथील काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणी हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली : नागपूर येथील काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणी हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नागपूर खंडपीठानं जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून जात प्रमाणपत्राची वैधता मान्य केली आहे. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Rashmi Barve big relief from nagpur bench of high court stayed decision of Caste verification committee)

Rashmi Barve
Archana Patil: महायुतीचा धारशिवचा उमेदवार अखेर ठरला! ओमराजे निंबाळकरांविरोधात लढणार अर्चना पाटील

रश्मी बर्वे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतू जात पडताळणीत त्या अपात्र ठरल्यानं त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी रद्द ठरवली होता. पण आता त्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी त्यांना निवडणूक मात्र लढवता येणार नाही. (Latest Marathi News)

Rashmi Barve
Virat Kohli IPL 2024 : मला आशा आहे की विराट... आरसीबीच्या सततच्या पराभवाने व्यथित डिव्हिलियर्सचा खास दोस्ताला मोलाचा सल्ला

हायकोर्टानं या प्रकरणी कुठल्याही प्रकरणी आदेश दिलेला नसला तरी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहोत, असं रश्मी बर्वे यांनी सांगितलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून ज्या नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात होतं त्या राणांच्या जात प्रमाणपत्रावरील हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. (Marathi Tajya Batmya)

यावरुन सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आणि म्हणाल्या, "मग सरकार कोणाचं आहे? ज्यांच्याकडं पैसा आहे, धनदौलत आहे त्यांच्या बाजून सरकार उभं राहतं हे दिसून आलं आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com