Sangli Lok Sabha : अचानक स्ट्राँगरूमचा अलार्म वाजला अन् प्रशासनाची उडाली धावपळ, मत यंत्राच्या गोदामाला कडेकोट बंदोबस्त

मतदानाची ईव्हीएम मशीन व निवडणूक कागदपत्रे मिरजेतील शासकीय गोदामात स्वतंत्र स्ट्राँगरूममध्ये ठेवली आहेत.
Strongroom in Miraj Government Godown
Strongroom in Miraj Government Godownesakal
Summary

मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँगरूमला दोन ठिकाणी अग्निशमन अलार्म यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

सांगली : मिरजेतील शासकीय गोदामात (Miraj Government Godown) ईव्हीएम आणि निवडणूक कागदपत्रे स्ट्राँगरूममध्ये (Election Documents Strongroom) ठेवली आहेत. त्याला अत्याधुनिक यंत्रणेसह कडेकोट व्यवस्था तैनात आहे. काल झालेल्या पावसाने पहाटे चार वाजता स्ट्राँगरूमचा अलार्म वाजला आणि जिल्हा प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मात्र, आगीमुळे अलार्म वाजला नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंबामुळे वाजत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

प्रशासनाकडून बसवलेली यंत्रणा अत्याधुनिक व सक्षम असल्याने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघासाठी झालेली मतदानाची ईव्हीएम मशीन व निवडणूक कागदपत्रे मिरजेतील शासकीय गोदामात स्वतंत्र स्ट्राँगरूममध्ये ठेवली आहेत. ईव्हीएम व कागदपत्र ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरूम सुरक्षित असून, या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

Strongroom in Miraj Government Godown
लोकसभेच्या मैदानातच विधानसभेच्या बंडाची बिजे; महायुती-मविआ राहणार कागदावरच, मतदारसंघांत बंडखोरी अटळ

मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँगरूमला दोन ठिकाणी अग्निशमन अलार्म यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. एक गोदामाच्या आतील बाजूस व दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर ही यंत्रणा आहे. आज पहाटे चारच्या दरम्यान स्ट्राँगरूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलार्म वाजला. पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते. स्ट्राँगरूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या अग्निशमन कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. अलार्म आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला.

उमेदवार श्रीमती सुवर्णा गायकवाड, नानासो बंडगर, उमेदवार प्रतिनिधी संदीप पाटील, गजानन साळुंखे, आनंद रजपूत, दत्तात्रय पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी संयुक्त भेट आज सकाळी दिली. त्यावेळी बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी आगसदृश कोणतीही परिस्थिती निर्दशनास आलेली नाही. यावेळी उपस्थितांनी सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Strongroom in Miraj Government Godown
Uddhav Thackeray Interview: महाराजांनी सूरत लुटली आणि मोदी शहांनी शिवसेना लुटली.. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीची आकडेवारीच सांगितली

स्ट्राँगरूमला कडेकोट व्यवस्था

मिरजेतील शासकीय गोदामात मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. गोदामात प्रवेश करण्यापूर्वीच तपासणी केली जाते. त्यानंतर आतील भागात पूर्णतः अत्याधुनिक यंत्रणा बसवली आहे. त्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणेसह अलार्म सिस्टीम आहेत. तसेच नियंत्रण कक्षही उभारला आहे. यासह केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात आहेत. परिसरातील अर्धा किलोमीटर परिसरात कोणालाही फिरू दिले जात नाही. तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com