Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

लोकसभेच्या मैदानातच विधानसभेच्या बंडाची बिजे; महायुती-मविआ राहणार कागदावरच, मतदारसंघांत बंडखोरी अटळ

लोकसभा (Kolhapur Lok Sabha) निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक पक्ष एकत्र आले.
Summary

करवीरमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी आमदार पी. एन. पाटील आणि शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात थेट लढत होऊ शकते.

कोल्हापूर : लोकसभा (Kolhapur Lok Sabha) निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक पक्ष एकत्र आले. मात्र, लोकसभेसाठी एकत्र आलेली महायुती किंवा इंडिया महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत कागदावरच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीतच विधानसभेची तयारी करणाऱ्या आजी-माजी आमदारांसह इच्छुकांच्या उमेदवारीवरून बंडखोरी उफाळणार असल्याचे चित्र आहे.

Kolhapur Lok Sabha
Yakub Baba Dargah : 'या' भागात शिवरायांचे गुरू म्हणून याकुबबाबा का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या घुमट नसलेल्या दर्ग्याची दंतकथा

भाजपसह घटक पक्षांची महायुती होण्यापूर्वी कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे एकमेकांवर टीका करत राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ किंवा घाटगे यांच्यापैकी एकाला माघार घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार संजय घाटगे हे मुश्रीफ यांच्यासोबत होते.

मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजय घाटगे किंवा अबंरिश घाटगे हे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यामागे राहिले. त्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळू शकते. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीकडून राजू आवळे यांचा विद्यमान आमदार म्हणून दावा असेल. शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी आमदार सुजित मिणचेकर हे गेल्या पाच वर्षांपासून विधानसभेची तयारी करत आहेत. भाजपमधून अशोक माने हे दावा करतील. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून असणार आहेत. याशिवाय, शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांनीही तयारी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही एक उमदेवार असणार आहे.

Kolhapur Lok Sabha
Degree Education : पदवी शिक्षण आता 4 ऐवजी 3 वर्षांचे होणार; नव्या शैक्षणिक धोरणाची यंदापासूनच अंमलबजावणी

राधानगरी मतदारसंघात शिंदे गटाकडून आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे हे महायुतीकडून सक्रिय होते. विधानसभेला हे तिघेही इच्छुक असणार आहेत. महाविकास आघाडीकडून ए. वाय. पाटील हे दावेदार असू शकतात. चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून तर भाजपकडून शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्राम कुपेकर हे इच्छुक असणार आहेत. चंदगडमधून माजी आमदार संध्याताई कुपेकर गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत ठाम राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी आमदार कुपेकर किंवा नंदाताई बाभूळकर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊ शकते. यामध्ये काँग्रेसकडूनही एखादा दावेदार असणार आहे.

Kolhapur Lok Sabha
Satara Lok Sabha : निवडणूक खर्चात उदयनराजे आघाडीवर तर, शशिकांत शिंदे दुसऱ्या क्रमांकावर; किती केलाय दोघांनी खर्च?

इचलकरंजीत महायुतीकडून भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर तर घटकपक्ष म्हणून आमदार प्रकाश आवाडे हे दावेदार असणार आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यात आली होती. यावेळी आवाडे यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाळावा लागल्यास हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडीमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर आहेत. लोकसभेच्या निकालानंतर तेथील राजकीय गणित ठरणार आहेत. मात्र, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्येच ही लढत होणार आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातून माजी आमदार राजेश क्षीरसागर असणार आहेत. तसेच, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून सत्यजित कदम यांना संधी दिली होती. यामध्ये भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून भाजप आपला दावा सोडणार नाही. या ठिकाणी सत्यजित कदम, महेश जाधव किंवा माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांना संधी दिली जाऊ शकेल. काँग्रेसमधून विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना पुन्हा संधी दिली जाण्याचे संकेत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय पवार आणि रविकिरण इंगवले हे दावेदार असू शकतात.

Kolhapur Lok Sabha
Hatkanangale Lok Sabha : मतदार यादीतील नावं गहाळ! मतदान न करता आल्याने 'या' गावातील लोक न्यायालयात करणार याचिका दाखल

पी. एन. पाटील - चंद्रदीप नरके थेट लढत शक्य

करवीरमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी आमदार पी. एन. पाटील आणि शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात थेट लढत होऊ शकते. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये ही लढत होईल. दरम्यान, काही अपवाद वगळता विधानसभेच्या सर्वच मतदारसंघांत बंडखोरी होणार हे निश्‍चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com