उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस कार्यकर्ते नाही जाणार; महाविकास आघाडीत तणाव, राष्ट्रवादीनं स्‍वीकारलं निमंत्रण

उद्धव ठाकरे यांचा मेळावा सायंकाळी होणार आहे. त्याआधी मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महत्त्‍वाची बैठक होणार आहे.
Uddhav Thackeray Sangli Sabha
Uddhav Thackeray Sangli Sabhaesakal
Updated on
Summary

काँग्रेस सांगली लोकसभा मतदारसंघ लढविण्यावर ठाम आहे. शिवसेनेने माघार घेतली नाही, तरी लढण्याचा नेत्यांचा इरादा आहे.

सांगली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मिरजेतील सभेला काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्‍थित राहणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र शिवसेनेचे निमंत्रण स्‍वीकारत मेळाव्यात ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीत महाविकास आघाडीत जिल्ह्यात देखील तणावाचे वातावरण तयार झाले आहे. दोन्ही बाजूंनी संयमाने प्रतिक्रिया देत वाद टोकाला जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा मेळावा सायंकाळी होणार आहे. त्याआधी मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महत्त्‍वाची बैठक होणार आहे. त्यात सर्वच जागांवर शिक्कामोर्तब करून घोषणादेखील होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेसच्या लोकसभा समितीची आज दिल्लीत बैठक झाली. त्यामुळे वादातील जागांसह सर्वच मतदारसंघांचा निकाल उद्याच अपेक्षित आहे. ठाकरे यांच्या सभेपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब झाले तर वातावरण बदलून जाईल. सांगलीचा विषय मागे ठेवला तर मात्र शिवसेना मेळाव्यात शक्‍तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हाभरातून लोक जमविले जात आहेत.

Uddhav Thackeray Sangli Sabha
Loksabha Election : यादी लांबली... उत्सुकता ताणली; इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते अस्वस्थ, नजरा लागल्या मुंबई-दिल्लीकडे

या गर्दीत काँग्रेस कार्यकर्ते दिसणार नाहीत. जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना तसे कळविले आहे. काँग्रेस सांगली लोकसभा मतदारसंघ लढविण्यावर ठाम आहे. शिवसेनेने माघार घेतली नाही, तरी लढण्याचा नेत्यांचा इरादा आहे. अशावेळी निर्णय होत नाही तोवर शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला जाणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेसने कळवली आहे.

Uddhav Thackeray Sangli Sabha
Sangli Loksabha : 'सांगलीत मविआ जो उमेदवार देईल, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल'; काय म्हणाले नितीन बानुगडे-पाटील?

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी संपर्क साधला होता. त्यांचा सन्मान करतो. मात्र, सध्या काँग्रेस आणि शिवसेनेत उमेदवारीवरून थोडा तणाव आहे. तो संपेल. त्यानंतर जे काही होईल, त्यानुसार आम्ही एकदिलाने काम करू. तोवर शिवसेनेच्या मेळाव्याला हजर राहणे योग्य ठरणार नाही, असे त्यांना कळवले आहे.

-आमदार विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर येत आहेत. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते मेळाव्याला हजर राहतील. राहिला विषय काँग्रेस व शिवसेनेतील उमेदवारीच्या वादाचा, तो वरिष्ठ मंडळी लवकर संपवतील.

-संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com