Sanjay Shirsat : राऊतांमुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, हा शरद पवार यांच्या स्क्रिप्टचा एक भाग

‘‘दिवस उगवला की, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर खासदार संजय राऊत तोंडसुख घेतात. याच राऊतांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावून भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ दिली होती’’,
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatsakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘दिवस उगवला की, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर खासदार संजय राऊत तोंडसुख घेतात. याच राऊतांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावून भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ दिली होती’’, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे राऊत हे आता पवार झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Shirsat
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची आज पुण्यात सभा

आमदार शिरसाट म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावणे, हा शरद पवार यांच्या स्क्रिप्टचा एक भाग होता. भावनिक राजकारण करून राजीनामा द्यायला लावून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा डाव होता. त्यांना संजय राऊत यांची साथ होती. संजय राऊत हा कुणाचा माणूस,असे विचाराल तर ते शरद पवार यांचे खास आहेत, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही’’, असा दावाही त्यांनी केला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ मतदारसंघांत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिरसाट यांना विचारले असता, ‘‘निवडणूक लढविण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे’’, असेही शिरसाट म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com