Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची आज पुण्यात सभा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा मंगळवारी (ता. ३०) होणार आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा मंगळवारी (ता. ३०) होणार आहे.

ही सभा वारज्यातील आर. एम. डी. कॉलेजच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होईल. सुळे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. तिन्ही पक्षांचे अनेक नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.

Loksabha Election 2024
Narendra Modi : पुण्याला काहीच नाही उणे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेत ‘गॅरंटी’

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कॉंग्रेस, पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याला महाविकास आघाडीचे नेते कसे प्रत्युत्तर देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com