Shashikant Shinde: साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन जागांवरील उमदेवार आज जाहीर करण्यात आली आहे.
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal

Shashikant Shinde : सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीकडून अद्याप साताऱ्यातील उमेदवार जाहीर केलेला नसला तरी उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळं आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे अशी लढत होण्याची शक्यता आहे. (Satara Lok sabha Election 2024 Sharad Pawar has announced candidature of Shashikant Shinde)

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाकडून आज दोन जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या १० जागांपैकी ९ जागांवरील उमेदवार अत्तापर्यंत जाहीर झाले आहेत. आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित करणं राहिलं आहे. (Latest Marathi News)

Shashikant Shinde
Lok Sabha Elections: "उमेदवारांना प्रत्येक संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही, जोपर्यंत..."; सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

मंगळवारी महाविकास आघाडीच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचं सूत्र ठरलं होतं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला २१, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला १० जागा निश्चित झाल्या आहेत.

यांपैकी राष्ट्रवादीनं आत्तापर्यंत ९ जागा आणि तिथले उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेनेनं सर्व २१ जागांवरील उमेदवार नावांसहित जाहीर केले आहेत. तर काँग्रेसकडून सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Shashikant Shinde
Lok Sabha Elections: "उमेदवारांना प्रत्येक संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही, जोपर्यंत..."; सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

दरम्यान, साताऱ्याची जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवणार की भाजप यावरुन सध्या संभ्रम आहे. पण अद्याप या जागेची महायुतीकडून घोषणा करण्यात आलेली नाही. पण उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून पक्ष श्रेष्ठींना भेटून आल्यानंतर त्याचंं साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांचं नाव साताऱ्यातून भाजपचा उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

पण महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याचीच भाजप वाट पाहत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com