Sharad Pawar : शशिकांत शिंदेंना अटक केल्यास आंदोलन ; महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही

सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

दहिवडी : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जर अटक केली, तर राज्यातील तालुक्या-तालुक्यामध्ये संयमाने आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करून हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही, हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांनी दिला.

बाजार पटांगणात माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक देशाची लोकशाही टिकवायची की नाही? लोकशाहीवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या हातात सत्ता द्यायची, की नाही? याची आहे. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; पण या राज्यकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही.

त्यांच्यावर टीकाटिप्पणी केली म्हणून झारखंड, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकले. सत्तेचा गैरवापर केला जातोय. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेणं ही तुमची, माझी जबाबदारी आहे.

शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा

सातारा : नवी मुंबई बाजार

Sharad Pawar
Devendra Fadnavis : भारतासाठी भाजपला मतदान करा ; विकासाचा मार्ग मोकळा करा

समिती एफएसआय वाटप

कथित घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com