Kolhapur Loksabha Constituency
Kolhapur Loksabha Constituencyesakal

खासदार मंडलिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; येत्या चोवीस तासांत 'कोल्हापूर'ची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता!

काँग्रेसकडून (Congress) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्‍चित झाली असताना महायुतीचा उमेदवार मात्र ठरेना.
Summary

येत्या चोवीस (बुधवारी) तासांत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Loksabha Constituency) महाविकास आघाडीतील समाविष्ट काँग्रेसकडून (Congress) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्‍चित झाली असताना महायुतीचा उमेदवार मात्र ठरेना. या पार्श्‍वभूमीवर महायुतीचे संभाव्य उमेदवार व खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी काल थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत उमेदवारीबाबतचा संभ्रम संपवण्याची मागणी मंडलिक यांनी केल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्‍चित नाही. राज्यात भाजपचे विद्यमान २३ खासदार आहेत, यापैकी २० जागांवर भाजपने यापूर्वीच उमेदवारांची घोषणा करताना बहुतांश ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे.

महायुतीत उर्वरित २८ जागांचा निर्णय झालेला नाही, त्यात कोल्हापूर व हातकणंगले या जिल्ह्यातील दोन जागांचा समावेश आहे. या दोन्ही जागांवरील विद्यमान खासदार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेकडे आहेत. तथापि दोन्ही खासदारांनाच उमेदवारी मिळेल का नाही याविषयी उत्सुकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत या जागा धोक्यात असल्याने यावरील निर्णय लांबल्याचे बोलले जाते.

Kolhapur Loksabha Constituency
रणजितसिंहांच्या उमेदवारीला रामराजेंचा विरोध; माढा मतदारसंघाचा तिढा कायम, अजितदादा-फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाहीच!

महाविकास आघाडीचा कोल्हापुरातील उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवार प्रा. मंडलिक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता लवकर संपावी, यासाठी प्रा. मंडलिक आज पहाटेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले. मुंबईत शिंदे- मंडलिक यांची भेट झाली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही, पण प्रा. मंडलिक यांनाच उमेदवारी मिळेल, असा शब्द शिंदे यांनी दिल्याचे समजते.

Kolhapur Loksabha Constituency
Raigad Loksabha : तटकरेंसमोर मित्र पक्षांचं आव्हान; निवृत्तीनंतर पुन्हा राजकीय आखाड्यात उतरलेल्या गितेंना समाजबांधवांचाच विरोध

येत्या चोवीस तासांत ‘कोल्हापूर’ची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

येत्या चोवीस (बुधवारी) तासांत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार-गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या १३ जागांचा तेथे निर्णय होईल, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. यासाठी आज प्रा. मंडलिकांनी मुंबईत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com