Chandradeep Narke Sanjay Mandlik
Chandradeep Narke Sanjay Mandlikesakal

Kolhapur Lok Sabha : 'मंडलिकांच्या विजयासाठी जीवाचं रान करा'; चंद्रदीप नरकेंचं शिवसैनिकांना आवाहन

दहा वर्षांत केंद्र सरकारने दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली.
Summary

'देशाची प्रतिमा उंचावरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणणे आवश्यक आहे.’

कोल्हापूर : महायुतीचे (Mahayuti) उमेदवार, विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी पाच वर्षांत जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे, विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधांबरोबरच गावपातळीवरील अनेक विकासकामे मार्गी लावली. करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी ताकदीने खासदार मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी केले.

Chandradeep Narke Sanjay Mandlik
Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

कळंबा येथील अमृतसिद्धी लॉन येथे त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. नरके म्हणाले, ‘खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी करवीर विधानसभा (Karveer Assembly) मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. दहा वर्षांत केंद्र सरकारने दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. विमानतळाचे विस्तारीकरण, रेल्वेस्थानकाचे अत्याधुनीकरण झाले. केंद्र सरकारने साखर उद्योगाला जी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली, त्यामुळे साखर उद्योग कठीण काळात तरला. शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.

Chandradeep Narke Sanjay Mandlik
Hatkanangale Lok Sabha : ..अन् धैर्यशील मानेंनी शेट्टींचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला!

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांना गती दिली आहे. देशाची प्रतिमा उंचावरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणणे आवश्यक आहे.’

गोकुळ संचालक अजित नरके म्हणाले, ‘केंद्र सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. देशात रस्ते आणि अनेक प्रकल्प उभे केले. खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील रेल्वे, रस्ते याबाबतीत धोरणात्मक प्रश्न संसदेत मांडले. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूया.’

Chandradeep Narke Sanjay Mandlik
मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहांचा गंभीर आरोप

गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपप्रमुख संजय पाटील, करवीर तालुकाप्रमुख कृष्णात पोवार, पन्हाळा तालुकाप्रमुख अरुण पाटील, गगनबावडा तालुकाप्रमुख तानाजी काटे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, कोमल मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, यशोदा पाटील, रवी चौगले, पी. डी. पाटील, पांडुरंग खाटीक, कुंभी कारखाना, कुंभी कासारी बँक, यशवंत बँकेचे संचालक, पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख अजित पाटील-परितेकर यांनी केले. आभार कुंभी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com