Vijay Shivtare : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंची समजूत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी राजकीय पंगा घेणारे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्ह्यातीन नेते विजय शिवतारे यांची ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली.
Vijay Shivtare
Vijay Shivtaresakal

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी राजकीय पंगा घेणारे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्ह्यातीन नेते विजय शिवतारे यांची ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यात शिवतारे यांच्या राजकीय समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते.

शिवतारे व या तिघांतील चर्चा चर्चा सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे समजते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिवतारे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते मात्र अजूनही त्यांनी भूमिका मांडलेली नाही. मात्र शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या उमेदवारीवरून माघारी घेतल्याचे समजते.

शिवतारे यांना चर्चेसाठी शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर दोन वेळा बोलावले  होते. या बैठकीत शिवतारे यांनी ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. मला थांबवू नका, असे मुख्यमंत्र्यांना समजावले होते. यावर ‘युतीधर्म पाळायला हवा’, असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले होत. मात्र त्यांनतरही आता अजित पवारांना माझा आवाका दाखवतो, असे म्हणत पवार यांच्याविरोधात शिवतारेंनी दंड थोपटले होते.

Vijay Shivtare
Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’

तसेच अजित पवार यांच्या गटाकडूनही शिवतारेंवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती. गेली काही दिवस महायुतीत या विषयावरून खटके उडत आहेत. त्यामुळे शिंदे गटही शिवतारे यांच्याविरोधात भूमिका घेण्याची तयारीत होता. मात्र काल रात्री शिंदे, पवार व फडणवीस यांनी शिवतारे यांची समजूत घातल्याचे समजत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com