किस्से निवडणुकीचे : वाजपेयींचा विक्रम अबाधितच

कवितेमधून व्यक्त करणारे आणि त्याप्रमाणे राजकीय आयुष्य खरोखरीच जगलेले भाजपचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण निवडणुकीच्या निमित्ताने होणे अपरिहार्य आहे.
atal bihari vajpayee
atal bihari vajpayeesakal

‘क्या हार में, क्या जीत में; किंचित नहीं भयभीत मैं...हो कुछ,

 पर हार नहीं मानूंगा’ असा वज्रनिर्धार आपल्या

 कवितेमधून व्यक्त करणारे आणि त्याप्रमाणे राजकीय आयुष्य खरोखरीच जगलेले भाजपचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण निवडणुकीच्या निमित्ताने होणे अपरिहार्य आहे.

वाजपेयी यांनी १९५७ च्या आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत बलरामपूर आणि मथुरा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. यापैकी बलरामपूर येथून त्यांचा विजय झाला होता, तर मथुरेत त्यांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले होते. अर्थात, त्यावेळी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील उगवता तारा होते आणि जनसंघही फार मोठा पक्ष नव्हता. नंतर मात्र १९५७ ते २००४ या निवडणुकीच्या दीर्घ कारकिर्दीत सर्वाधिक सहा वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडून येण्याचा विक्रम वाजपेयींनी आपल्या नावावर केला.

बलरामपूर (उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर (मध्य प्रदेश), विदिशा (मध्य प्रदेश), लखनौ (उत्तर प्रदेश), गांधीनगर (गुजरात) आणि नवी दिल्ली या सहा मतदारसंघातून वाजपेयींनी यश मिळविले होते. आपल्या कारकिर्दीत वाजपेयी दहा वेळा लोकसभेवर निवडून गेले, तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, ग्वाल्हेरमध्ये १९८४ ला झालेल्या पराभवाचीही चर्चा झाली होती. जन्मठिकाण असलेल्या ग्वाल्हेरमधून त्यांनी १९७१ ची निवडणूक जिंकली होती.

atal bihari vajpayee
Loksabha Election 2024 : महायुती अन् मविआ पेचात ; चर्चेच्या फेऱ्यांनंतरही जागावाटपाचा तिढा सुटेना

याच ठिकाणाहून १९८४ मध्येही त्यांनी अर्ज भरला होता आणि विजय होईल, अशी त्यांना खात्री होती. मात्र, अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही वेळ आधी काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांनीही अर्ज भरला आणि त्यामुळे वाजपेयींना धक्काच बसला. एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, यानंतर वाजपेयींनी घाईघाईने शेजारील भिंड मतदारसंघातूनही अर्ज भरण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, ते वेळेत पोहोचू शकले नाहीत.

ज्या मथुरेतून वाजपेयींचे डिपॉझिट जप्त झाले होते, तो मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आणि ज्या ग्वाल्हेरमध्ये माधवराव शिंदेंनी वाजपेयींचा पराभव केला होता ते ग्वाल्हेर व माधवरावांचे पुत्र ज्योतिरादित्य हे दोघेही भाजपकडे आहेत. प्रचारात सध्या वाजपेयींचे नाव अभावानेच उच्चारले जात असले तरी, ‘काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं...’ असे म्हणणारे वाजपेयी चिरकाल जनतेच्या स्मरणात राहतील, हे निश्‍चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com