Ambulance Scam : "अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यात 280 कोटींचा अ‍ॅडव्हान्स...."; रोहित पवारांनी पुन्हा टाकला बॉम्ब

डोळ्यादेखत हा घोटाळा होत असताना यात मोठे खेकडे सहभागी असल्यानं सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी गप्प आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
rohit pawar
rohit pawar Sakal

मुंबई : राज्यात मोठा अॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर आता पवारांनी नवा आरोप केला आहे. त्यानुसार, अॅम्ब्युलन्स घोटाळ्यात २८० कोटींचा अॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. (advance of 280 crores in ambulance scam trying to withdraw rohit pawar again alleged)

रोहित पवारांनी ट्विट करत ही नवी माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, राज्याच्या आरोग्य विभागाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असलेल्या ॲम्बुलन्स घोटाळ्यात ‘मोठ्या खेकड्या’ने नांग्या मारण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यात पुरवठादारामार्फत २८० कोटींचा ॲडव्हान्स काढण्याचा प्रयत्न केला, परंतू पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचं आधीच पोस्टमॉर्टेम केल्यानं अधिकाऱ्यांनी ‘आता लगेचच नको’ असं सांगत नकार दिल्याचं कळतंय.

rohit pawar
Manipur Lok Sabha Campaign: मणिपूरमध्ये प्रचारातही भीतीचं सावट कायम! सार्वजनिक सभा नाही, इन कॅमेरा बैठकांवर भर

दिवसाढवळ्या डोळ्यादेखत हा घोटाळा होत असताना केवळ मोठे खेकडे सहभागी असल्यानं सरकारमधील बडे नेते आणि अधिकारी गप्प असले तरी आम्ही मात्र यात सहभागी सर्व खेकड्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही. अधिकाऱ्यांना विनंती आहे, या घोटाळ्यात भागीदार होऊ नका अन्यथा खूप महागात पडेल. सरकारनंही ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा जनताही सरकारच्या नांग्या ठेचायला मागं-पुढं पाहणार नाही, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

rohit pawar
रांची विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; शोध मोहीम सुरू

दरम्यान, राज्यातील आरोग्य विभागात सहा हजार कोटी रुपयांचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी आठवडाभरापूर्वी केला होता. राज्यातील तब्बल सहा हजार कोटींचा 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा' सकाळ माध्यम समुहाच्या 'सरकारनामा'नं उघडकीस आणला होता. त्यानंतर विरोधकांनी सरकारला या घोटाळ्यावरून घेरलं. (Marathi Tajya Batmya)

rohit pawar
Gadchiroli: दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक, राज्य सरकारकडून साडे पाच लाखांचे होते बक्षीस; एक जनमिलिशियाही ताब्यात

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या टेंडरमध्ये काही बदल करून, राज्य सरकारनं एक प्रकारे हा घोटाळा कबूलच केला आहे. त्यानंतर आता ठाकरेंनीही या घोटाळ्यावरून शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवार यांनी या घोटाळ्यातील दुसरी फाइल ओपन करून या घोटाळ्याच्या सायरन पुन्हा एकदा वाजवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com