Kalyan Election: मुंबई-ठाण्यात मिळून 9 मतदारसंघात मतदान; कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद

देशभरात पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे.
Mumbai Lok Sabha Constituency Elections
Mumbai Lok Sabha Consituency Electionsesakal
Updated on

मुंबई : देशभरात पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. यामध्ये मुंबई आणि ठाण्यात मिळून ९ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. यांपैकी ताज्या आकडेवारीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. (Voting going on in 9 constituencies in Mumbai Thane Kalyan recorded the lowest)

Mumbai Lok Sabha Constituency Elections
Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

महाराष्ट्रातील आज एकूण १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये कल्याण मतदारसंघात सर्वात कमी ४१.७० टक्के इतकं मतदान झालं आहे. तर पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५४.३२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Mumbai Lok Sabha Constituency Elections
Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

सर्व मतदारसंघांची संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी पाहुयात

भिवंडी - 48.89%

धुळे - 48.81%

दिंडोरी - 57.06%

कल्याण - 41.70%

उत्तर मुंबई - 46.91%

उत्तर मध्य मुंबई -47.32%

उत्तर पूर्व मुंबई - 48.67%

उत्तर पश्चिम मुंबई - 49.79%

दक्षिण मुंबई - 44.22%

दक्षिण मध्य मुंबई -48.26%

नशिक - 51.16%

पालघर -54.32%

ठाणे - 45.38%

Mumbai Lok Sabha Constituency Elections
'बाल'कलाकार अनिल कपूरच्या लेकीच्या हाती वस्तरा!

मुंबईत अतिशय संथ मतदान

मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर अतिशय संथरित्या मतदान सुरु होतं. मतदारांना तब्बल तीन ते चार तास रांगेत थांबण्याची वेळ आली. यामुळं नागरिकांना निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठा संताप व्यक्त केला. अनेक नागरिक शेवटी वैतागून मतदान न करताच निघून गेले. पण या प्रकाराची माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर ओरड झाल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी अखेर याची दखल घेत उशीरापर्यंत नागरिकांचं मतदान करुन घेण्यात येईल असं जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com