Kolhapur Lok Sabha : दोन दिवस आदीच सगळा 'कारभार' हुणार...; ज्याचं पटंलं त्यालाच मतदान 'करायचं ठरलंय'

'निम्म्यांचं मत ‘मोदीच येणार’ (Narendra Modi) तर काही जणांचं मत ‘भाकरी परतणार’.
Rajarshi Shahu Market Yard
Rajarshi Shahu Market Yardesakal
Summary

''निवडणुकीत आता कॉँग्रेसला उमेदवार शोधायची वेळ आली. देश चालवतील अशी दहा नावं कॉँग्रेसमध्ये हाईत काय सांगा बघू कोण?.’’

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. राजर्षी शाहू मार्केट यार्डातल्या (Rajarshi Shahu Market Yard) हमालांना मात्र निढळाच्या घामाशिवाय पर्यायच नाही. आपापल्या कामात ही माणसं इमानेइतबारे रममाण आहेत. रणरणत्या उन्हात घामाघूम झालेली त्यांची शरीरं आणि त्यात मग थोडीसी उसंत मिळाली की, सारी मंडळी कट्ट्यावर एकवटतात आणि सुरू होतो निवडणुकीच्या चर्चेचा फड. ‘कधी नाय एवढी ईर्ष्या हाय यंदाच्या निवडणुकीत.

थोड्या शेतकऱ्यास्नी (Farmers) पैसे मिळालं आणि थोड्या नाही. त्यामुळं ही चिडल्याली लोकं उलटच करणार बगा...’ असा सूर उमटताच दुसरा लगेचच त्यात ‘कायबी असू दे दोन दिवस आदीच सगळा ‘कारभार’ हुणार बगा...’ असं भाकित करून चर्चेची रंगत वाढवतो... दिवस शनिवारचा. कालची सुटी झालेली आणि नव्या दमानं ही सारी मंडळी कामावर आलेली. निम्म्यांचं मत ‘मोदीच येणार’ (Narendra Modi) तर काही जणांचं मत ‘भाकरी परतणार’. चर्चेत मग खडाखडी सुरू होते आणि आपापले मुद्दे प्रत्येक जण पुढे रेटू लागतात. तितक्यात राजाराम बोलायला लागतो, ‘आमचा खासदार कवा तरी एकदा पाच वर्षात गावाकडे आला होता. मात्र आबा सहज भेटणारा हाय.

Rajarshi Shahu Market Yard
'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

दांडगी शेतीवाली शेट्टी म्हणत्यात. सरंपचाचा एक गट मानेंकडे जाणार आहे. त्यो पण माग लागलाय आमच्या. मानेंना साथ द्या म्हणून. पण मतदानाच्या वेळपर्यंत जो कुणी आमच्यापर्यंत पोचंल, ज्याचं पटंल त्यालाच मतदान करायचं ठरवलंय आम्ही.’ तुकारामला पण मग आता राहवत नाही. तो सांगू लागतो, ‘आमच्याकडे पन्हाळ्यात खालती सावकारांच्या शब्दाला अजूनही मान हाय. सावकारांची सूचना आली की दोन चार गावांतील मतदान फिरतंय. आत्ता आमच्याकडं तिघाबी उमेदवारांची चर्चा हाय. त्यात आबा जोरात हाय. पण, नुसत्या चर्चेवर विश्‍वास ठेवण्‍यात काय अर्थ नाय. मतदानाच्या दोन दिवस आदी काय ‘कारभार’ घडतोय. त्यावर मतदान फिरणार बगा.’ चर्चेचा फड आता चांगलाच तापू लागलेला.

पण, हातातली कामं पटापटा आवरायला पाहिजेत, म्हणून काही जण उठून जातात. त्याचवेळी अलीकडच्याच काळात यार्डात हमालीला यायला लागलेला जवान पोरगा यशवंत येथे येतो आणि चर्चेत पडतो. तो सांगू लागतो, ‘‘खासदारांचे काय नाही, पण केंद्रात मोदी सरकारच यायला पायजे. आमच्या गावातील निम्मी पोरं खासदारापेक्षा मोदीकडं बघून मतदान करत्यात. एरव्ही फिरतील आपापल्या नेत्यांच्याबरोबर, पण मतदान ‘कमळा’लाच करणार.’’ आता श्रीपतीला गप्प बसवत नाही. तो जरा तावातावाने बोलू लागतो ‘‘अरे सहा महिन्यांपूर्वी व्हिडिओ व्हायरला झालता. त्यात ते पोरगं म्हणत हुत मोदी सरकार म्हणू नका, सरकार कोणा एकाच्या नावाचं नसतयं. सगळ चांगलं केलं, असं म्हणत्यात.

Rajarshi Shahu Market Yard
Raigad Lok Sabha : 'निवडणुकीत पराभव झाला, तर राजकारणातून संन्यास घेईन'; 'मविआ'च्या उमेदवाराचा मोठा निर्णय

पण एक पण काम कडेवर गेलं नाही. नोटा बंदी फसल्याली. पेट्रोल, गॅस दरवाढ काय कमी हुईत नाही. गरिबांना पैसे देणार हुते म्हणं तेबी अजून काय दिलं नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी दिली. त्यात अनेकांना मिळाली नाही. फशिवल्यामुळे चिडल्याली लोक उलट मतदान करतील बगा तुम्ही... त्यामुळं आमच्या हिकडं तर ‘हात’च हाय अजून फार्मात.’’ बराच वेळ शांतपणे चर्चा ऐकणारा यशवंताही आता बोलायला लागतो. ‘‘गेल्या दहा वर्षांत ईडी मागं लावली. तशी पटापटा पळाली सारी ‘भाजप’त.

निवडणुकीत आता कॉँग्रेसला उमेदवार शोधायची वेळ आली. देश चालवतील अशी दहा नावं कॉँग्रेसमध्ये हाईत काय सांगा बघू कोण?.’’ यशवंताच्या या प्रश्‍नावर रवीने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ‘‘कॉँग्रेस आणि त्यांच्या इतर पक्षांकडं ढिगाणं माणसं हायती. डाव्या पक्षाचे नेतेही हुशार आहेत. पण, अलीकडच्या काळातलं राजकारण त्यांना अजूनबी कळल्यालं नाही. ज्यांच्या मागं ईडी लावली त्यास्नीच आता तिकीटंबी दिलीत की.’’

Rajarshi Shahu Market Yard
Kolhapur Lok Sabha : मोदींच्या थापांना पुन्हा बळी पडू नका; आमदार भास्कर जाधवांचं मतदारांना आवाहन

कुणी किती बाजार समिती धुतली?

सगळ्या चर्चेचा अंदाज घेत उत्तम बोलायला लागतो. ‘‘माझ्या भावकीची शेती पण आहे. मी हमाली बी करतोय. बाजार समितीत सगळेच पक्ष कधीना कधी सत्तेत होते. कुणी किती बाजार समिती धुतली तुम्हाला माहिती आहे. गूळ व्यवसाय धोक्यात आला, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील सोडून अन्य कुणीही कधी आमच्याबाजूने आवाज काढला नाही. कुणी केंद्रातून गुळाला, माथाडी कामगारांसाठी अनुदान आणले का? आपल्या दहा वर्षांपूर्वी चाळीस लाख रवे उचलत होतो. आत्ता साऱ्या सिझनमध्ये मिळून वीस लाख रवे होत नाहीत. साऱ्याच पक्षाची माणसं बाजार समितीत संचालक म्हणून येत्यात आणि तीच आता सांगत्यात ह्येला मतदान करा आणि त्येला करू नका, म्हणून. आपण फक्त त्यांचं ऐकायचं आणि आपल्याला पटतं त्येच करायचं.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com