महानायकाने निवडणूक लढवली तर महिलांनी मतदान पत्रिकेवर सोडली लिपस्टिकची छाप, जाणून घ्या मनोरंजक किस्सा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणूका १९५१-५२ साली झाल्या होत्या. तेव्हापासून आत्तापर्यंत निवडणूकांमधील प्रचार- प्रसार, मतदान आणि मतमोजणीबाबत असे अनेक किस्से घडले, जे प्रत्येक निवडणूकीवेळी लोकांना आठवतात.
amitabh bachchan
amitabh bachchansakal

Amitabh Bachchan Election Story: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणूका १९५१-५२ साली झाल्या होत्या. तेव्हापासून आत्तापर्यंत निवडणूकांमधील प्रचार- प्रसार, मतदान आणि मतमोजणीबाबत असे अनेक किस्से घडले, जे प्रत्येक निवडणूकीवेळी लोकांना आठवतात.

असाच एक मजेदार किस्सा १९८४ च्या लोकसभा निवडणूकांदरम्यान घडला होता, ज्यामध्ये महिलांनी मतदान पत्रिकेवर लिपस्टिकची छाप सोडली होती.

भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक अभिनेता अमिताभ बच्चन अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय लोकदलाचे दिग्गज नेता हेमवती नंदन बहुगुणा उभे होते. १९७७ साली याच हेमवती बहुगुणा यांनी जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळवून देण्यात खूप मदत केली होती.

बहुगुणा यांना हारवण्यासाठी राजीवने आपल्या मित्राला उतरवले-

१९८४ च्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर होतं होत्या. या निवडणुकांमध्ये राजीव गांधींच्या खांद्यावर संपूर्ण काँग्रेस पक्षाची जबाबदारी होती आणि त्यांना हेमवती बहुगुणा यांचा राजकीय बदला सुद्धा घ्यायचा होता.

जनतेची सहानुभूती काँग्रेससोबत होती. तेव्हा राजीव गांधी यांनी आपला मित्र अभिनेता अमिताभ बच्चन यांना मैदानात उतरवले आणि अलाहाबादमधून त्यांना उमेदवारी दिली. या निवडणूकीत अमिताभ बच्चन यांनी हेमवती बहुगुणा यांना काट्याची टक्कर दिली.

मतदान पत्रिकेवर महिलांनी सोडली लिपस्टीकची छाप-

अमिताभ बच्चन आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्यातील स्पर्धा मनोरंजक होत चालली होती. अमिताभ बच्चन प्रचारासाठी ज्या ठिकाणी जात तेथे लोक त्यांची तास-तास वाट पाहत बसायचे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिला त्यांच्या अंगावर आपल्या ओढण्या टाकत.

त्यावेळी निवडणूक मतपत्रिकेचा वापर केला जायचा. जेव्हा मतमोजणी सुरु झाली, तेव्हा अधिकारी महिलांची एक गोष्ट पाहून चकित झाले होते. महिलांनी मते तर अमिताभ बच्चन यांना दिली होती परंतु त्याच्यावर आपल्या ओठांच्या लिपस्टिकची छाप सुद्धा सोडली होती.

amitabh bachchan
Amitabh Bachchan : दहा दिवस चित्रीकरण करुन अमिताभ यांनी सोडला होता चित्रपट

यामुळे जवळपास ४ हजार मतदानपत्र रद्द केली गेली होती. असे होवून सुद्धा अमिताभ बच्चन यांना २ लाख ९७ हजार ४६१ मते मिळाली होती. तसेच भारतीय लोकदलाचे नेते हेमवती नंदन बहुगुणा यांना १ लाख ९ हजार ६६६ मते मिळाली होती आणि अभिनेता अमिताभ बच्चन मोठ्या फरकाने विजयी झाले होते.

त्यांना अलाहाबादचे रहिवासी असल्याचा फायदा सुद्धा या निवडणूकीत झाला होता. अमिताभ बच्चन जनसभेत म्हणायचे, "मी जिथे पण जातो, तिथे मला छोरा गंगा किनारेवाला म्हणतात."  या सर्व गोष्टींचा फायदा अमिताभ बच्चन यांच्या पक्षाला झाला होता.

amitabh bachchan
Big B Amitabh Bachchan : अमिताभ यांच्यामुळे शाळेत मिळाला प्रवेश! प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितली आठवण

अमिताभ यांना राजकारणात नव्हता रस-

अमिताभ बच्चन आता लोकसभा निवडणूक जिंकून खासदार तर झाले होते. परंतु त्यांना राजकारणात टिकणे जमले नाही. ते खासदार म्हणून ५ वर्षाचा काळ सुद्धा पूर्ण करु शकले नाहीत. ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी खासदारकीचा राजिनामा दिला होता. बोफोर्स घोटाळ्याने त्यांच्यात आणि गांधी कुटूंबामध्ये दुरावा आला होता. 

 "मी राजकारणात येवून चूक केली, मी भावनेच्या भरात निवडणूक लढण्यासाठी तयार झालो होतो परंतु राजकारण खरोखर खुप वेगळे आहे. शेवटी मी हार मानली," असे अमिताभ बच्चन राजीनामा देताना म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com