Loksabha 2019 : अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत!

ashok chavan
ashok chavan

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. आधी विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित होवून ते मागे पडले. आता विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली. अशोक चव्हाण शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशासाठी आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला.

चव्हाण यांच्या सांगण्यावरून धानोरकर यांनी राजीनामा दिला होता. मात्र ते उमेदवारी देवू शकले नाही. त्यामुळे माझे कुणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मलाच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बांगडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. एका कार्यकर्त्याशी बोलताना त्यांनी आपलीच मानसिकता राजीनामा देण्याची असल्याचे सांगितले. या संभाषणाची क्लिप सध्या समाज माध्यमावर चांगलीच वायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com