पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून फारक घेत, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांची कोंडी करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय (मामा) शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत, त्यांना माढ्यातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरविले जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदे हे शुक्रवारी पक्षात प्रवेश करणार आहे. त्यानंतर सायंकाळी पुण्यात माढ्यातून शिंदे यांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यासाठी पवार हे पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांच्यासह काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्याची चिन्हे आहे.
माढ्यातून डावलले जाण्याच्या भीतीने मोहिते-पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांना रोखण्याच्या हेतूनेच राष्ट्रवादीकडून शिंदे यांना पसंती देणार असल्याचे स्पष्ट आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.