मतदानाच्या सुट्टीचा वापर फिरण्यासाठी करताय? मग हे वाचाच!

मतदानाच्या सुट्टीचा वापर फिरण्यासाठी करताय? मग हे वाचाच!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता.29) होत आहे. या मतदानासाठी काही कर्मचाऱ्यांना सुट्टीही मिळाली असेल. मात्र, या सुट्टीचा वापर मतदानासाठी न करता कुठंतरी फिरायला जाण्यासाठी करत असाल तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही. 
 
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जुन्नरमधील एका पर्यटन केंद्राकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या मतदानाला दांडी मारून फिरायला येणार असाल तर आमच्याकडे बुकिंग मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. 

जुन्नरमधील पराशर कृषी पर्यटन केंद्राने मतदानाच्या दिवशी (ता.29) आणि मतदानाच्या आदल्या दिवशीचे (ता.28) बुकिंग घेणे रद्द केले आहे. तसेच ज्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्या ठिकाणच्या मतदारांनी जर पर्यटन केंद्राकडे बुकिंगची चौकशी केली, तर संबंधितांना बुकिंग नाकारुन मतदानाचे आवाहन केले जात आहे. 

दरम्यान, जुन्नरमधील या पर्यटन केंद्राच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com