LokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार? 

Narendra Modi
Narendra Modi

राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत राजेभोसले यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळविण्याचा विश्‍वास भाजप आणि शिवसेनेच्या युतीला आहे. तरीही, ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. गेल्या वेळी मोठमोठी आश्‍वासने देऊन भाजप सरकार सत्तेत दाखल झाले; पण अंमलबजावणीच्या बाबतीत त्यांनी जनतेचा भ्रमनिरासच केला. आज या तरुण देशासमोर बेरोजगारीचा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, अशी जनतेला आशा होती. त्यामुळेच 2014 मध्ये तरुण वर्गाने मोदींना भरभरून पाठिंबा दिला. पण मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीच्या प्रमाणात वाढच झाली आणि त्यामुळे तरुण वर्ग भाजपपासून दुरावला आहे. 

आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी भाजपवर नाराज आहे. राज्यातील कुठल्याही ग्रामीण भागात गेल्यावर लक्षात येईल, की शेतकरी वर्ग सरकारच्या कृषी धोरणावर नाराजी व्यक्त करत आहे. 'शरद पवारच आपल्याला न्याय देऊ शकतील', ही भावना पुन्हा एकदा शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. शेतकरी संघटनाही 'महाआघाडी'मध्ये सहभागी झाल्यामुळे ग्रामीण भागातून भाजपला पूर्वीसारखा पाठिंबा मिळेल का, याबाबत शंकाच आहे. 

शेतकरी, शेतमजूर वर्गाला भाजपकडे आकर्षित करेल असा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता आता भाजप-शिवसेनेकडे नाही. नितीन गडकरी यांनी राज्यात रस्त्याचे जाळे निर्माण केले. पण शेतमालाचे पडलेले भाव, बेरोजगारी, दहशतवाद हे सर्व मुद्दे विसरून फक्त वाहतूक सुधारणा केली म्हणून भाजपला मतदारांचा कल मिळेल का? 

स्थानिक नाराजीमुळे भाजप-शिवसेनेने अर्ध्या डझनाहून अधिक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले. त्यावरूनच युतीमधलं वातावरण काय आहे, हे दिसून येते. गेली साडेचार वर्षे शिवसेनेने भाजपवर 'चौकीदार चोर है' म्हणेपर्यंत टीका केली. पण अखेर त्यांच्याचबरोबर युती केली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरीही स्थानिक पातळीवर युतीधर्म पाळला जाईल का, हा प्रश्‍न निर्माण होतोच. यंदा 'महाआघाडी'च्या नेत्यांनी तिकीट वाटपामध्ये विशेष काळजी घेतली आहे. आघाडीला शेतकरी संघटना, शेकापसारख्या मित्रपक्षांचीही साथ मिळाली आहे. राज ठाकरे यांची भूमिकाही 'महाआघाडी'ला पूरक अशीच आहे. दुसऱ्या बाजूला युतीचे मित्रपक्ष 'आम्हाला सन्मानकारक जागा मिळाल्या नाहीत' म्हणून उघडउघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील वारे भाजप-सेनेच्या विरोधातच वाहत आहेत. 

--------------------------------------------------------------------------

यंदाच्या निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहे? 
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला गेल्या निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता येईल का? 

विश्‍लेषण फक्त पत्रकारांनीच करावं, असं थोडंच आहे! तुम्हीही बिनधास्त मांडा तुमची मते आणि निरीक्षणे! किमान 150 शब्दांमध्ये लेख लिहा आणि ई मेल करा webeditor@esakal.com इथे आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com