Loksabha Results : ...तर देशात सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकणार 'हा' उमेदवार

Loksabha Results : ...तर देशात सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकणार 'हा' उमेदवार

लोकसभा निकाल 2019 :
नवी दिल्ली : लोकसभा निकालाच्या मतमोजणीला सुरवात झाली आणि सुरवातीपासूनच भाजपने देशभरात आघाडी घेतलेली दिसून आली. देशभरात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. देशात मोदींपेक्षाही जास्त म्हणजेच सर्वाधिक मताधिक्य घेऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडून येईल अशी सध्या तरी शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांना एकूण 629324 मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले डॉ. जे. सी. चावडा यांना 233294 मते पडली आहेत. सध्या अमित शहा यांना 396030 मतांची मोठी आघाडी असल्याने देशभरातून तेच सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील हे निश्चित आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवत असून त्यांनाही अमित शहा यांच्याएवढे मताधिक्य मिळालेले नाही.

दरम्यान, महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 85 जागांवरच आघाडी मिळविता आली. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जोडी रोखण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना काहीही यश आलेले दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीमध्ये दिसत नाही. या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com