Loksabah 2019 : भाजपतर्फे लोकसभा व दोन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नावे निश्चित 

BJP decides names for Lok Sabha and two assembly by elections
BJP decides names for Lok Sabha and two assembly by elections

गोवा - प्रदेश भाजप राज्य निवडणूक समितीची बैठक होऊन लोकसभेच्या दोन जागांसाठी उत्तरेतून श्रीपाद नाईक व दक्षिणेतून अॅड. नरेंद्र सावईकर यांची तर पोटनिवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघातून दयानंद सोपटे व शिरोड्यातून सुभाष शिरोडकर यांची नावे निश्चित झाली आहेत. त्यांची ही नावे केंद्रीय निवड समितीकडे आज पाठविली जातील.

म्हापसा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपचे माजी आमदार स्व. फ्रांसिस डिसोझा यांचे पुत्र ज्योसुया डिसोझा, सुधीर कांदोळकर व रुपेश कामत यांचा समावेश आहे. या तीन नावांवर उद्या 18 मार्चला पुन्हा बैठकीत चर्चा होऊन नावे पाठविली जातील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती काल बरीच खालावली होती मात्र आज ती काहीशी स्थिर आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे दिल्लीला भाजप नेत्यांना भेटण्यास गेले आहे यासंदर्भात आम्हाला माहीत नाही. भाजपला पक्ष वाढवताना सबका साथ सबका विकास करायचा आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची दारे कोणालाही खुली असतील असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com