Loksabha 2019 : कामत यांच्याबाबतीत अफवा हा भाजपचा डाव - गिरीश चोडणकर 

BJP trying to spread a rumor against Kamat says Girish Chodankar
BJP trying to spread a rumor against Kamat says Girish Chodankar

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊ शकतात ही भाजपनेच पसरवलेली अफवा आहे असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ते म्हणाले, आपल्याला हव्या त्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यासाठी घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आली असून त्यानुसार भाजपचे मडगाव मंडळ आता कामत यांच्या भाजप प्रवेशाला पूर्वनियोजित नियोजनानुसार विरोध करणार आहे.

चोडणकर म्हणाले, कामत दिल्लीला जाणार हे आधीच ठरलेले होते. सध्याच्या राजकीय स्थितीत त्याचा गैर अर्थ काढला जाऊ नये म्हणून त्यांनी काल मला त्याची कल्पना दिली होती. खरेतर ते काल रात्रीच जाणार होते मात्र उशिर झाल्याने ते आज सकाळी गेले. कामत यांना भाजपमध्ये घेणार आहे तर त्याची एवढी उघड चर्चा भाजप का करत आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये प्रवेश देताना अशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नव्हती. यावरून कामत यांना प्रवेश देणे हा नव्हे तर काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा भाजपचा डाव ही माहिती प्रसारीत करण्यामागे आहे.

तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकांत पराभव दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. मात्र तो याखेपेला यशस्वी होणार नाही, असेही चोडणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com