Election Results : ममता बॅनर्जींना दणका; भाजपची बंगालमध्ये मुसंडी! 

गुरुवार, 23 मे 2019

पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत.

लोकसभा निकाल 2019 :  कोलकाता : पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कमालीचे वाकयुद्ध झाले होते. बॅनर्जी आणि मोदी-अमित शहा-योगी आदित्यनाथ यांच्यातील शाब्दिक चकमकी संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. इतकेच नव्हे, तर अमित शहा यांच्या रोड शोमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यावरूनही राजकीय रण पेटले होते. 

2014 च्या निवडणुकीमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला चार, तर भाजप आणि डाव्या पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे तृणमूलच्या जागा 34 वरून 23 जागांपर्यंत खाली आल्या आहेत. 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP wins big in West Bengal as Mamata Banerjee suffers loss in Lok Sabha 2019