Loksabha 2019: भाजप प्रदेशाध्यक्षांच्या हेलिकॉप्टरची आयोगाच्या पथकाकडून झाडाझडती

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- राजकीय नेत्यांवर कारवाईचा निवडणूक आयोगाचा बडगा
- बंगळुरू येथील एका हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग पथकाची कारवाई 

बंगळुरू - राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याचा बडगा निवडणुक आयोगाने उगारला आहे. बंगळुरू येथील एका हेलिपॅडवर जाऊन निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग पथकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली.

कर्नाटकातील शिवमोगा येथून येडियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर निघणार होते. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकातील अधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरमधील प्रत्येक सामानाची तपासणी केली. मात्र, त्यामध्ये काहीही सापडले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येत आहे, यामुळेच निवडणुक आयोग या काळात सतर्क राहून अशा प्रकारच्या कारवाया करत आहे.

दरम्यान, कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या गाड्यांचा ताफाही काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवला होता. यावरून कर्नाटकात वाद निर्माण झाला होता.

Web Title: BS Yeddyurappas luggage checked in Karnataka