Loksabha 2019 : राजनाथसिंहांनी केली आठवले स्टाईल 'कविता'

Chowkidar chor nahi pure hai India ka cure hai says Rajnath Singh turns poet at rally
Chowkidar chor nahi pure hai India ka cure hai says Rajnath Singh turns poet at rally

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'चौकीदार' या शब्दावरून रामदास आठवले स्टाईल कविता सादर केली. संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, राजनाथसिंह चर्चेत आले आहेत.

भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या विजय संकल्प रॅलीत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, 'चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है.' रामदास आठवले स्टाईलने कविता सादर केल्यामुळे त्यांनी वाहवा मिळवली. शिवाय, नेटिझन्सनी संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल केली. यामुळे ते चर्चेत आले आहेत.

भाजप आणि काँग्रेसमध्ये चौकीदार या शब्दावरुन चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है... अशी घोषणा वारंवार करतात. त्या टीकेला राजनाथसिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना कविता सादर केली. राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है' या टीकेचा भाजपने सोशल मीडियावरून प्रचारासाठी वापर केला. भाजपने सोशल मीडियावर 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सुरू केले. मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांनी त्यांच्या नावासमोर चौकीदार शब्द जोडण्यास सुरुवात केली. तोच धागा पकडत राजनाथसिंह यांनी पंतप्रधान मोदींसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com