काँग्रेसही आमच्यासोबतच - अखिलेश

Akhilesh-Yadav
Akhilesh-Yadav

लखनौ - लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर होणे बाकी असतानाही सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात महाआघाडी स्थापन झाली असून, त्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदलबरोबर काँग्रेसही असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली. रायबरेली आणि अमेठी या दोन जागा काँग्रेसला दिल्याचे ते म्हणाले. रालोदचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश म्हणाले की, अजून लोकसभेची तारीख जाहीर झाली नाही. मात्र, जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हा देशात नवीन सरकार असेल आणि पंतप्रधानही नवीन असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com