Congress Manifesto : काँग्रेसचा जाहीरनामा दिखाऊ : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

काँग्रेसचा जाहीरनामा हा पूर्वीप्रमाणेच दिखाऊ असून मायाजालप्रमाणे आहे. आश्‍वासनांविरोधातच काम करण्याच्या काँग्रेसच्या सवयीमुळे या पक्षाबद्दल लोकांमध्ये विश्‍वासार्हता राहिलेली नाही.
- मायावती

लखनौ : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे दिखावा व मायाजाल असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) टिट्वरवरून केली. पूर्वीचा अनुभव पाहता काँग्रेसने दिलेल्या आश्‍वासनांबद्दल विश्‍वाससार्हता वाटत नाही, असे त्या म्हणाल्या.

मायावती यांनी काँग्रेसबरोबरच भाजपवरही निशाणा साधला. आश्‍वासनांच्या पूर्ततेच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीही फरक नाही, असे मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. "काँग्रेसचा जाहीरनामा हा पूर्वीप्रमाणेच दिखाऊ असून मायाजालप्रमाणे आहे. आश्‍वासनांविरोधातच काम करण्याच्या काँग्रेसच्या सवयीमुळे या पक्षाबद्दल लोकांमध्ये विश्‍वासार्हता राहिलेली नाही,'' असे त्या म्हणाल्या. समाजवादी पक्ष- बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोकदल या पक्षांच्या युतीमुळे भाजप भयभीत झाला आहे, अशी टीका करताना त्या म्हणाल्या की, 'ते एवढे घाबरले आहेत की समस्यांवर बोलण्याऐवजी भाजप या युतीमधील वरिष्ठ नेत्यांविषयी विनाकारण जातीयवादी वक्तव्ये करीत आहे. अशा वक्‍त्यांमुळे कोणीही संतप्त न होता निवडणुकीत चांगली कामगिरी करीत त्यांनी तोडीस तोड उत्तर द्यावे.'

Web Title: Congress manifesto just showoff and an illusion: Mayawati