Congress Manifesto: 'हम निभाएंगे', जाहीरनाम्यात काँग्रेसची नवी घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

- लोकसभा निवडणुका समोर ठेऊन काँग्रेसकडून जाहीरनामा
- जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन काँग्रेसने आज निवडणुक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी हम निभाएंगे अशी जाहीरनाम्यात काँग्रेसकडून नवी घोषणा देण्यात आली. 'जन आवाज' असे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव असून, जाहीरनाम्यात कुठलीही खोटी घोषणा नसल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला, यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.

जाहीरनाम्यात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या काही महत्वाच्या घोषणा
- गरिबांचे उत्पन्न किमान 72 हजार रुपये करणार
- गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची जाहीरनाम्यात काँग्रेसकडून हमी
- जाहीरनाम्यात शेतकरी, बेरोजगारांना प्राधान्य
- देशातील तरूणांसाठी जाहीरनाम्यात महत्वाच्या गोष्टींची तरतूद
- शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही तर तो कायदेशीर गुन्हा नसेल

Web Title: Congress Releases Poll Manifesto For 2019 Elections