Loksabha 2019 : मी भाजपसोबतच - गोविंद गावडे

I am with BJP only clarifies govind ranade
I am with BJP only clarifies govind ranade

पणजी : भारतीय जनता पक्षाने आपला विधीमंडळ नेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल त्याआधी आम्हालाही विश्वासात घ्यावे, असे मत पक्ष आमदार आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, आम्ही वारंवार सांगितले आहे, की आमचा पाठींबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला होता व आहे. भाजपने नेतृत्व बदल केला तरी मी भाजपसोबत असेन असेही मी सातत्याने सांगत आलो आहे. गोवा फॉरवर्डचे तीन व आम्ही तीन अपक्ष जी 6 या नावाने गट स्थापन करून एकत्र आलो आहोत यामागे केवळ गोमंतकीयांना चांगले सरकार देणे हाच उद्देश आहे. गेले वर्षभर विकासकामे गतीने सरकली नाहीत, त्यामुळे नेतृत्वाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा असे आमचे म्हणणे होते व आहे.

भाजपचा नेता कोण असावा? हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्हीही सरकारमध्ये असल्याने त्यांनी आम्हालाही कोणताही निर्णय घेताना विश्वासात घ्यावे अशी आम्ही रास्त अपेक्षा आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपमध्ये येणार आहेत की नाही याबाबत मला काहीच माहिती नाही. मी अपक्ष आमदार असल्याने मी राजकीय पक्षाच्या व्यवहारांबाबत टिका टिप्पणी करणार नाही. समाजकारणासाठी मला राजकारण करायचे आहे. मात्र सरकारच्या नेतृत्वात बदल करण्यापूर्वी विश्वासात घ्यावे एवढेच माझे म्हणणे आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com