Loksabha 2019 : देशद्रोहाचे कलम रद्द करण्यावर कन्हैया कुमार म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कन्हैया कुमार याने या मुद्द्याला समर्थन दिले आहे.

लोकसभा 2019
​नवी दिल्ली : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमार याने हे कलम रद्द झालेच पाहिजे असे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'हम निभाएंगे' (आम्हीच पूर्तता करणार) असे घोषवाक्‍य आणि भुरळ घालणाऱ्या आश्‍वासनांची लयलूट असलेल्या 'जनसंवाद घोषणापत्र' या जाहीरनाम्यातून काँग्रेसने गरीब, तरुण, शेतकरी, महिला मतदारांना साद घातली. याबरोबरच काँग्रेसने केंद्रात सत्तेत आल्यास राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे भारतीय दंडसंहितेतील कलम 124 अ रद्द करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही केली.

याविषयी बोलताना कन्हैया म्हणाला, की भारतीय दंडसंहितेतील कलम 124 अ हे इंग्रजांनी बनविलेले कलम आहे. त्यामुळे हे कलम आता राजकीय पक्षांनी रद्द केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर सर्वच पक्षांनी या कलमाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला आहे.

Web Title: Kanhaiya Kumar Comment on canceling the section of treason