Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले, 'जहा खडे हो, वही रहो' (व्हिडिओ)

Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले, 'जहा खडे हो, वही रहो' (व्हिडिओ)

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेत गर्दी खेचून आणण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. परंतु एक लाख लोकांची बसण्याची क्षमता असणाऱ्या या सभास्थळावर मागच्या बाजूच्या खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या होत्या. लोकांनी खुर्चीवर खुर्ची ठेवत खुर्च्या एकत्र केल्या आणि त्यावर उभे राहून मोदींची सभा पहिली. 

समोरच्या तरुणांच्या गर्दीला उत्तर देताना मोदींनी सभेतून एक डोयलॉगही बोलून दाखविला. मोदींनी ग्राउंड सभेसाठी छोटे पडले असे सांगत गर्दी बरीच जमली हे आपले प्रेम आहे अशा शब्दात जमलेल्यांचे आभार मानले.  तर दुसरीकडे मागच्या भागात आणि मध्येही मात्र खुर्च्या रिकाम्याच होत्या. वाढत्या तापमानामुळे बरेच लोक आल्या पावली परत जात होते.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभा सभा भाजप, शिवसेना, रिपाइं युतीच्या उमेदवारांकरिता महत्त्वाची मानली जात होती. गांधीभूमीतील या प्रचारसभेकरिता जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, मागील वेळीच्या निवडणुकीप्रमाणे यंदा नरेंद्र मोदी अपेक्षित गर्दी जमविण्यात अपयशी ठरले. या सभेला 30 ते 35 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. मोदी यांचे भाषण सुरू असताना पारा 42 अंश सेल्सिअसवर होता. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना मोदींच्या भाषणाचा ज्वर चढत होता; मात्र उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झालेल्या अनेक महिला-पुरुषांनी वृक्षांचा आसरा घेतला, तर काहींनी भाषण सुरू असतानाच परतीचा मार्ग धरला.

उपस्थित जनसमुदायाविषयी वेगवेगळे दावे करण्यात येत असले तरी मोदींचे भाषण सुरू असताना मागील बाजूचे खाली मैदान बरेच काही बोलत होते. महत्त्वाचे म्हणजे या पार्श्‍वभूमीवरही मोदी यांनी स्वतःच मैदान संपूर्ण भरल्याचे सांगत 'जहा खडे हो, वही रहो', असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com