Loksabha 2019 : हार्दिक निवडणुकीस मुकणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना आज गुजरात उच्च न्यायालयाने झटका देत त्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात हार्दिक सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात पण त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना आज गुजरात उच्च न्यायालयाने झटका देत त्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात हार्दिक सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात पण त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात याआधी ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका यांनी उच्च न्यायालयामध्ये सादर केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने हार्दिक यांना निवडणुकीस मुकावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचा हात हातात घेणारे हार्दिक जामनगरमधून निवडणूक लढविणार होते.

Web Title: Loksabha Election 2019 Hardik Patel Election Politics High Court