Loksabha 2019 : राज्यात मोदींच्या सभांचा धडाका

Narendra-Modi
Narendra-Modi

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक किंवा दोन एप्रिलला त्यांची पहिली सभा होईल.

उत्तर प्रदेशच्या खालोखाल लोकसभेच्या जागा असणारा (४८) महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, राज्यात या वेळेस २०१४ इतके अनुकूल वातावरण युतीसाठी नाही, असे फीडबॅक दिल्लीत आले आहेत. राज्यातील सरकारबद्दल नव्हे, तर केंद्र सरकारविरुद्धचा रोष राज्यात जास्त प्रमाणात असल्याचे संघाच्या अहवालातूनही दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय नेतृत्वापैकी नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी या तिघांवरच राज्यातील प्रचाराची जास्तीत जास्त धुरा राहणार आहे. प्रत्येक तीन मतदारसंघांमागे मोदींची एक सभा घेण्याचे नियोजन भाजपने केले आहे. 
राज्यात ११ व १८ एप्रिलच्या तुलनेत तिसऱ्या

व चौथ्या टप्प्यात (२३ व २९ एप्रिल) मतदान होणाऱ्या मतदारसंघांची संख्या जास्त असल्याने त्याच टप्प्यात मोदींच्या जास्त सभा व्हाव्यात, यासाठी राज्य भाजप आग्रही आहे. मुंबईत २६-२७ एप्रिलला मोदींच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपची संयुक्त सभा मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय, केंद्रातील मंत्री व देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री तसेच शिवराजसिंह चौहान, रमणसिंह हे माजी मुख्यमंत्रीही प्रचारात सक्रिय सहभाग देतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com