चक्रीवादळाच्या मुद्यावरून ममतांचे राजकारण ः मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

"फणी' चक्रीवादळाच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. "फणी' चक्रीवादळामुळे पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला होता, मात्र बॅनर्जी यांनी माझ्याशी बोलणे टाळले, असा दावाही मोदींनी केला. 

तामलूक (पश्‍चिम बंगाल) ः "फणी' चक्रीवादळाच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. "फणी' चक्रीवादळामुळे पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला होता, मात्र बॅनर्जी यांनी माझ्याशी बोलणे टाळले, असा दावाही मोदींनी केला. 

पश्‍चिम बंगालमधील तामलूक येथील भाजपच्या प्रचारसभेत मोदींनी आज बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ""आजच मी फणी चक्रीवादळामुळे ओडिशात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर मी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्याशी बोलण्यास बॅनर्जी यांनी नकार दिला. मी बॅनर्जी यांच्या फोनची वाट पाहात होतो, मात्र त्यांनी फोन करण्याचे टाळले,'' असे मोदी भाषणात म्हणाले.

"स्पीडब्रेकर दिदी'ला फक्त राजकारणात रस आहे. फणी चक्रीवादळाच्या मुद्यावरही त्यांना राजकारण करायचे आहे. पश्‍चिम बंगालमधील सरकारी अधिकाऱ्यांशी बोलण्याची माझी इच्छा होती, मात्र त्यालाही बॅनर्जी यांनी विरोध केला, असे टीकास्त्र मोदींनी सोडले. "जय श्रीराम' म्हणणाऱ्या व्यक्तीला पश्‍चिम बंगालमध्ये तुरुंगात टाकले जाते, असा आरोपही मोदींनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi targets mamta banerjee over cyclone fani