Loksabha 2019: 'एनडीए'चा पराभव निश्‍चित'

Loksabha 2019: 'एनडीए'चा पराभव निश्‍चित'

नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्ट्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असल्याने मोदी सरकार लवकरच इतिहासजमा होणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज केला. बिहारमध्येही सत्ताधारी "एनडीए'ला पराभूत करून विरोधकांचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला.

संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष असलेले शरद यादव हे राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावरून यंदाची लोकसभा निवडणूक लढवित आहेत. हिंदी पट्ट्यामध्ये दलित आणि मुस्लिम विरोधकांच्या बाजूने असल्याचा दावाही यादव यांनी केला. 

दरम्यान, नितिशकुमार यांनी काँग्रेस, राजदसोबतची आघाडी मोडून भाजपसोबत सत्ता थाटली आहे. यामुळे नाराज झालेल्या जेडीयुच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा देत लोकशाही जनता दलाची स्थापना केली होती. निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष राजदमध्ये समाविष्ट केला जाणार आहे, असे राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी याआधी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com